ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सवानिमित्त अजून एक नाविन्यपूर्ण स्पर्धा.

कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सवानिमित्त अजून एक नाविन्यपूर्ण स्पर्धा.

प्रकाशन: 22 Dec 2022 12:37 PM
वाचन संख्या 85

कणकवली |ब्यूरो न्यूज : दरवर्षी कणकवली नगरपंचायत च्या पर्यटन महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भरणा असतानाच यावर्षी कणकवली नगरपंचायत च्या वतीने पर्यटन महोत्सव २०२३ च्या निमित्ताने Instagram Reels स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. ही एक आगळीवेगळी स्पर्धा घेत कणकवलीकरांना एक नवीन व्यासपीठ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात आले आहे. Instagram Reels स्पर्धा ही कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ शी निगडित असणार आहे व शहराच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, यासह खाद्य संस्कृती यावर आधारित असावी. या स्पर्धेकरिता स्पर्धकांनी Instagram वर पोस्ट करायच्या Reels (व्हिडिओ) हे जास्तीत जास्त एक मिनिटापर्यंतचे असावेत. त्यापेक्षा मोठे असू नयेत. तसेच हे (व्हिडिओ) रील २२ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंतच Instagram च्या कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सव २०२३ च्या पेजवर पोस्ट करायचे आहेत. त्यानंतर येणा-या Reels (व्हिडीओ) या स्पर्धेकरता ग्राह्य धरले जाणार नाहीत. कणकवली शहर मर्यादित ही स्पर्धा असणार असून, कणकवली शहरातील उत्कृष्ट Reels बनवणा-या पाच स्पर्धकांची व त्यांच्या Reels ची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे. या स्पर्धकांना पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट ५ Reels या कार्यक्रमस्थळी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या पेजवर आक्षेपार्ह कोणत्याही Reels (व्हिडीओ) पोस्ट करण्यात येऊ नयेत. त्या रील या स्पर्धेकरता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. या पेजवर Reels पोस्ट करत असते वेळी पुढील प्रमाणे युजरनेम टॅग करावे.

असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स