ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
हडी जेष्ठ नागरिक संघाचा २५ डिसेंबरला वर्धापनदिन..!

हडी जेष्ठ नागरिक संघाचा २५ डिसेंबरला वर्धापनदिन..!

प्रकाशन: 22 Dec 2022 11:40 AM
वाचन संख्या 43

मसुरे | प्रतिनिधी :
फेसकॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीचा पंधरावा वर्धापनदिन सोहळा हडी जठारवाडी शाळा नंबर २ येथे २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वर्धापन दिनानिमित्त सकाळच्या सत्रामध्ये सकाळी १० ते २ या वेळेत मोफत नेत्र शिबीराचे आयोजन विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रामध्ये दुपारी २.३० वा.उद्घाटन दिप प्रज्वलन , संघाचे जे सभासद निधन पावले त्यांना संघाच्या वतीने २ मिनिटे श्रध्दांजली, त्यानंतर साने गुरुजीच्या प्रार्थनेने सुरुवात, प्रमुख पाहुण्यांची ओळख परिचय संघाच्या अध्यक्षा
श्रीम. चंद्रकला कावले करतील.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होईल. दुपारी ३.१५ ते ३.३० वा. वैवाहिक जीवनात ५० वर्ष पूर्ण झालेल्या उभयतांचे सत्कार, दुपारी ३.३० ते ५ वा हभप श्री. हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, सायं. ५ ते ५.१० वा.आभार, अल्पोपहार पसायदान सांगता होणार आहे. उपस्थितीचे आवाहन संघाच्या वतीने अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स