ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुरक्तमित्रांचे रक्तदान ; मिळाले जीवनदान..!

सिंधुरक्तमित्रांचे रक्तदान ; मिळाले जीवनदान..!

प्रकाशन: 22 Dec 2022 11:01 AM
वाचन संख्या 177

मसुरे | प्रतिनिधी :
रक्तदान, देहदान, अवयवदान क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहणार्‍या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मूळ सिंधुदुर्गातील पण नोकरी व्यवसायानिमित्त गोव्यात राहणार्‍या पाच रक्तदात्यांच्या अनमोल सहकार्याने रक्तदानाची गरज पूर्ण केली.

शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी श्री अरुण हनपाडे (कारिवडे, सावंतवाडी) यांना बांबोळी गोवा येथे हिमोग्लोबिन कमी असल्याने बी पाॅझिटीव्ह रक्तगटाच्या रक्तदात्यांची गरज होती. त्यावेळी या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रूचिर ठाकूर (कणकवली), अक्षय सावंत (बिबवणे), सौरभ पडते (माजगांव), विष्णू धुरी (शेर्ले) आणि महादेव शेगडे (बांदा) या पाच रक्तदात्यांनी तथा सदस्यांनी बांबोळी गोवा रक्तपेढी येथे जाऊन रक्तदानामध्ये सहभाग घेतला. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदात्यांचे यानिमित्त कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स