ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा गड अभेद्य.

कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा गड अभेद्य.

प्रकाशन: 22 Dec 2022 10:29 AM
वाचन संख्या 81

सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व..

कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ व मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा गड अभेद्य राहिला आहे.दोन्ही तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखविला त्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.

कुडाळ तालुक्यातील बाव,कालेली, पुळास, निवजे, अणाव, गावराई, नेरूर देऊळवाडा, माणगाव, घावनळे, वारंगाची तुळसुली, झाराप, हिर्लोक, आंब्रड, डिगस, पणदूर, पावशी,कुंदे, पडवे, आंबडपाल, कडावल,वेताळ बांबर्डे, मांडकुली, भोयाचे केरवडे, मुळदे, तेंडोली या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ता प्रस्थापित केली आहे.

तर मालवण तालुक्यातील, श्रावण, रामगड, कोळंब, चौके, राठिवडे, बुधवळे कुडोपी, असरोंडी, बांधिवडे, तोंडवळी, वायंगणी, कांदळगाव, रेवंडी, तळगाव, देवली, वायरी, ओवळीये, साळेल, असगणी, खोटले या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स