ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मडुऱ्यात मगरींची दहशत कायम..!

मडुऱ्यात मगरींची दहशत कायम..!

प्रकाशन: 21 Dec 2022 06:52 PM
वाचन संख्या 56

बांदा | राकेश परब :
मडुऱ्यात मगरींची दहशत कायम असल्याचे वास्तव्य पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. डिगवाडी येथील शेतकरी बागायतदार भूषण प्रभू हे आपल्या बागायती जात असताना अचानक त्यांना पाण्याचा आवाज आला. हुशारीने त्यांनी पाहिले असता सहा ते आठ फुटी मगर त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तेथून आपला जीव वाचवला परंतु आपल्या पाळीव प्राण्यांना भविष्यात अशा महाकाय मगरींपासून धोका असल्याने वनविभागाने तात्काळ मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी मडुरा येथील सर्व शेतकरी बागायतदार तसेच नागरिकांनी केली आहे. मगरीच्या हल्ल्यात पाळीव जनावरे व मनुष्यहानी अनेकदा झाली. परंतु वनविभागाकडे मगरींच्या बंदोबस्तासाठी ठोस अशा उपायोजना नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास डिगवडी येथील शेतकरी भूषण प्रभू हे आपल्या बागायती जात होते. बागायती जवळ असलेल्या ओहळात सहा ते आठ फुटी मगर त्यांच्या निदर्शनास आली. ओहोळाजवळ नेहमी त्यांची पाळीव जनावरे तसेच मिरची, चवळी अशी रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार ये जा करावी लागते. यापूर्वी मगरींच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले तशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वनविभागाने आताच तात्काळ अशा धोकादायक मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी भूषण प्रभू तसेच संपूर्ण गावातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स