ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन…!

कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन…!

प्रकाशन: 21 Dec 2022 05:57 PM
वाचन संख्या 41

कुडाळ | प्रतिनिधी :
कुडाळ शहरामध्ये पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांचे संयुक्त योगोपचार शिबिर गुरुवार दिनांक २२ डिसेंबर २०२२ ते २६ डिसेंबर २०२२ दरम्यान होत आहे. सकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत शिबिर संपन्न होणार आहे . सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. दैवज्ञ भवन, शिवाजीनगर, कुडाळ येथे सदर शिबिर होणार आहे. तरी सर्व योगाभ्यास प्रेमींनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क शेखर बांदेकर 9823881712 , मेघा सुकी 9423303465 , तृप्ती तोरसकर 9420206050 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स