मालवण पॉलिटेक्निकच्या अनिकेत फडतरेचे यूपीएससी परीक्षेत यश!
प्रतिनिधी / मसुरे : शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या यंत्र विभागाचा माजी विद्यार्थी अनिकेत फडतरे हा यु पी एस सी परीक्षेमध्ये भारत देशातून ४२६ रँक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. डिप्लोमाच्या पहिल्या वर्षापासूनच सातारा येथील अनिकेत फडतरे हा विद्यार्थी यूपीएससीचे स्वप्न घेऊन शासकीय तंत्रनिकेतन मालवण मध्ये दाखल झाला होता. २०१३ मध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर अनिकेत याने पुणे येथील एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज मधून यंत्र विभागतूनच पदवी पूर्ण केली. युपीएससीच्या २०२१च्या बॅच मध्ये अनिकेत याने ऑल इंडिया रँक ४२६ मिळवून डिप्लोमा मध्ये उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. शासकीय तंत्रनिकेतन मालवण चे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी अनिकेतचे अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)