ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नेरूर येथील 'श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी'ने आज केला ग्रा.पं. निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.

नेरूर येथील 'श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी'ने आज केला ग्रा.पं. निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.

प्रकाशन: 11 Dec 2022 05:03 PM
वाचन संख्या 210

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’ची निवडणूक प्रचारात आघाडी.

पारंपारिक पद्धतीने श्री देव कलेश्वर मंदिर येथे श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरूवात.

नेरूर | देवेंद्र गावडे (उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारकार्याने आता वेग घेतला आहे.

अवघ्या काही दिवसांवर ग्रामपंचायत निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येत आहे.

आज श्री देव कलेश्वर मंदीर येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’च्या सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नेरूर गावचं ग्रामदैवत श्री देव कलेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचा शुभारंभ केला.

यावेळी नेरूर विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरीष्ठ नेते, ज्येष्ठ ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडीला नेरूर वासियांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स