नेरूर ग्रामपंचायत वाॅर्ड क्र. ४ मधून सौ. रूचा राजन पावसकर यांची ग्रा.पं. सदस्यपदी बिनविरोध निवड..!!
किंगमेकर शिवसेना शाखा प्रमुख बाळा पावसकर यांचा करिष्मा…!
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’ची जोरदार मुसंडी..!
कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गांव हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. याचीच पुनरावृत्ती होण्याच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत ‘श्री देव कलेश्वर ग्रामविकास आघाडी’ने एक पाऊल पूढे टाकताना वाॅर्ड क्रमांक ४ मधील आपल्या उमेदवार सौ. रूचा राजन पावसकर यांना बिनविरोध निवडून आणत प्रचार व निकालाच्या दृष्टीने आघाडी घेतली आहे.
हा किंगमेकर शिवसेना शाखा प्रमुख बाळा पावसकर यांचा खूप मोठा विजय मानला जात आहे. त्यांचाच हा करिष्मा असल्याच्या भावना शिवसेना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
शिवसेना विभाग प्रमुख शेखर गावडे यांनी या निवडी बद्धल समाधान व्यक्त केले असून नेरूरमधील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)