ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
करवीर निवासिनी देवी अंबाबाई मंदिरातील डिजीटल सुरक्षा यंत्रणेचा 'एक्सलन्स इन सिक्योरिटी' पुरस्काराने गौरव.

करवीर निवासिनी देवी अंबाबाई मंदिरातील डिजीटल सुरक्षा यंत्रणेचा 'एक्सलन्स इन सिक्योरिटी' पुरस्काराने गौरव.

प्रकाशन: 08 Dec 2022 10:58 AM
वाचन संख्या 45

कोल्हापूर | ब्युरो न्यूज : अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशभरातील एक कोटीहून अधिक भाविक कोल्हापूरच्या महालक्ष्मी तथा करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेबरोबरच भाविकांच्या सुरक्षेलाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्राधान्य देत मंदिरात डिजिटल सुरक्षा सिस्टीम कार्यान्वित केली. या सुरक्षेमुळेच मंदिराच्या चारी दरवाजातून एकही व्यक्ती घातक शस्त्र, विस्फोटक आतमध्ये आणू शकत नाही. जर पोलिसी नजर चुकवून कोणी शस्त्र, विस्फोटक मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला तल त्याचा हेतू मंदिराबाहेरच लक्षात येईल अशी ही डिजीटल सुरक्षा आहे. याच यंत्रणेच्या आधारे मंदिर व आवारातील चोऱ्याही काहीच तासात उघड करून चोरांना पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.

या सगळ्याची डिजीटल सुरक्षा सिस्टीमची मुंबईतील प्रामा हिकव्हिजन कंपनीने दिवाळीपूर्वी पाहणी केली. यामध्ये मंदिर व आवारातील कॅमेरे, चारही दरवाजांवरील डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील अद्ययावतही गंभीरपणे तपासला. त्यासंदर्भातील अहवाल दिल्लीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएफएसईसी कमिटीकडे पाठवला. या कमिटीनेही पाहणी अहवालाला गांभिर्याने घेऊन एक्सलन्स इन सिक्युटीरी ऍवॉर्ड जाहीर केला. हा पुरस्कार नुकताच दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या कार्यक्रमात देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे, उपअभियंता सुयश पाटील व सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप यांनी स्वीकारला. मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कार स्वरुप आहे.

गेल्या दोन दशकांत देशातील विविध धार्मिक स्थळ व परिसरात दहशतवादी कारवाया होत आहे. अंबाबाई मंदिर व परिसरातही अशी घटना घडू शकते, अशीही भीती व्यक्त होत होती. त्यामुळे आयबी आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश २००५ साली देवस्थान समितीला दिले होते. समितीनेही मंदिराच्या चारही दरवाजांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षही मंदिरात उभारला. पुढील काळात गरजेप्रमाणे कॅमेरेला वाढवले. २०१२ साली तर मंदिरात घातक शस्त्र, विस्फोटक येण्यावाचून रोखण्यासाठी मंदिराच्या चारही दरवाजांवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवले. त्यामुळे मंदिरात घातक वस्तू घेऊन जाण्याचे कोणाचे धाडस झाले नाही. कालांतराने कॅमेऱ्यांची संख्या वाढून सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष अधिक अद्ययाव केला. त्यामुळे मंदिरासह साऱ्या परिसरातील प्रत्येक भागावर स्वतंत्र वॉच राहिला.

केंद्र सरकारने २०१६ साली अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी आता डिजीटल यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आदेश देवस्थान समितीला दिले. या आदेशानुसार समितीनेही डिजिटल सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. सोबत टप्प्या-टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली. त्यामुळेच आजमितीला मंदिर व आवारावर तब्बल ८५ कॅमेऱ्यांचे लक्ष आहे. हे सर्व कॅमेरे ३६० अंशात फिरून परिसराचे अथक चित्रण करतात. नुकत्याच झालेल्या नवरात्रौत्सवात तर अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजांवरील मुळचे डिटेक्टर काढून त्याजागी अत्याधुनिक मल्टी झोन डोअर प्रेम मेटल डिटेक्टर डिटेक्टर बसवले. आरबीएल बँकेची ताराबाई पार्क शाखा व स्टेट बँकेने हे डिटेक्टर दिले आहेत. या डिटेक्टरमधील अल्ट्राझोन यंत्रणा प्रत्येक भाविकाच्या शरिरातील १८ भागांची तपासणी करुन त्यांच्या शरिराचे तापमानही मोजते. शिवाय प्रतिसेकंद भाविकांचे फोटोही काढते. कोट्यावधीच्या घरात फोटो सेव्ह राहतील, अशी या अद्ययावत डिटेक्टरमध्ये आहे.ही सगळी डिजीटल सुरक्षा सिस्टीमवर प्रभावित होऊन आयएफएसईसी कमिटीने एक्सलन्स इन सिक्युटीरी ऍवॉर्डसाठी निवड करुन देवस्थान समितीचा गौरव केला.

देवस्थान समितीने अंबाबाई मंदिराच्या परिसरावर वॉच ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे. या ड्रोनसह मंदिर व आवारातील डिजीटल सुरक्षा प्रणालीची कशी सुसज्ज ठेवायची याचे प्रशिक्षण सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप यांना दिले आहे.त्यासाठी त्यांना मुंबईला पाठवले. भविष्यातही पोलीस प्रशासन व आयबीकडून सुरक्षेच्या दृष्टीने जे आदेश मिळतील, त्याप्रमाणे डिजीटल सुरक्षा व्यवस्था केली जाईल. त्यासाठी विशेष निधी देवस्थान समितीकडून बाजूला काढून ठेवला जाईल अशी माहिती देवस्थान समितीच्या शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे.

(फोटो सौजन्य | कोल्हापूर ब्युरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स