तोरसोळेतील श्री भगवती देवी मंदिरात आज हरिनाम सप्ताह.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या तोरसोळे गांवचे जागृत ग्रामदैवत श्री. भगवती देवीच्या देवालयात आज ३ डिसेंबरला सात प्रहारांचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या हरिनाम सप्ताहाला ग्रामस्थ, भाविक, भजनी मंडळींनी उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी असे आवाहन बारा-पाच मानकरी आणि तोरसोळे ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)