ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चौके गांवचे सुपुत्र रमेश गावडे यांनी मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला पूर्ण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चौके गांवचे सुपुत्र रमेश गावडे यांनी मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला पूर्ण.

प्रकाशन: 03 Dec 2022 05:08 PM
वाचन संख्या 157

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके गांवचे सुपुत्र रमेश गावडे यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १६५० किमी सायकलिंग प्रवास नुकताच यशस्वी रित्या पूर्ण केला.  श्री गावडे हे मुंबईत आयकर विभागात सेवेत आहेत. ब्युटीज ऑन व्हील्स गृपला ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. श्री. गावडे हे नेहमी सायकलिंग करत असतात आणि ते इतरांनाही प्रेरणा देत असतात. आता पर्यंत त्यांनी ब-याच सायकलिंग राईड पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये पाचशे किमी पर्यंत अनेक छोट्या मोठ्या तसेच  मुंबई ते मालवण  अशा राईड पूर्ण केलेल्या आहेत.


मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर १४ नोव्हेंबरला बाल दिनाच्या रोजी सुरू केली होती.  आताची पिढी मोठी होत असताना त्यांना अभ्यास आणि खेळ याची आवड व्हावी तसेच आधुनिक काळात शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी सायकलिंगचे महत्व पटवून देण्याचा या सायकल सफरी मागे हेतू असल्याचे  गावडे म्हणाले.  २६/ ११ च्या  मुंबईवर झालेल्या हल्यातील शहीद पोलीस अधिकारी याना श्रध्दांजली वाहण्यासाठी त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी सदर राइड पूर्ण केली.
या मोहीमेला त्यांना गोवा मुख्य आयकर आयुक्त गोवा श्री. रंजन कुमार,  गोवा पोलीस अधिकारी श्री. सुबोध सक्सेना यांनी साथ केली.

प्रवासात विविध  ठिकाणी वेगवेगळ्या सायकलिंग गृप्सनी त्यांचे स्वागत केले.
कन्याकुमारी येथे पोलिस अधिकारी  हजर होते. गावडे यांचे राईड दरम्यान ओरोस येथे मालवण तालुक्यातील ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या सदस्यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या होत्या. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स