ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात ७ डिसेंबरला श्री.सद्गुरु दत्त जन्मोत्सव!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात ७ डिसेंबरला श्री.सद्गुरु दत्त जन्मोत्सव!

प्रकाशन: 03 Dec 2022 05:34 PM
वाचन संख्या 54

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : अध्यक्ष महेश इंगळे

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रयांची दत्त जयंती निमित्त अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात ७ डिसेंबरला श्री.सद्गुरु दत्त जयंती सोहळ्यानिमत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. श्री दत्त जयंती रोजी पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची पहाटे ५ वाजता काकडआरती व सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न होईल. यानंतर
सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दत्त जन्म आख्यान वाचन, व भजन करून सायंकाळी ६ वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा, आरती व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होतील. यानंतर श्री दत्त जन्म झाल्याने रात्रीची शेजारती होणार नाही.
श्रीदत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी ८ डिसेंबर रोजी पहाटेच्या काकड आरतीनंतर श्रीदत्त जन्मोत्सवा निमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने वटवृक्ष मंदिरात १५१ किलोचा केक कापण्यात येणार आहे व नंतर प्रसाद म्हणून वाटण्यात येईल. सकाळी ११:३० च्या महानैवेद्य आरती नंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करणेत येईल. दुपारी १ ते ३ या वेळेत देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे स्वामी भक्तांना भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत सालाबादाप्रमाणे अक्कलकोट शहरातून सवाद्य संपन्न होणारा श्रींचा पालखी मिरवणूक परंपरेप्रमाणे संपन्न होईल. रात्री ९:३० नंतर पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती सोहळ्याचा सांगता समारंभ होणार आहे.
दत्त जयंती निमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करिता स्वामी भक्तांच्या वतीने होणारे अभिषेक होणार नाहीत जे स्वामीभक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. तरी सर्व भाविकांनी दत्तजन्म सोहळ्याचा, श्रींच्या दर्शनाचा व भोजन महाप्रसादाचा, व पालखी सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स