ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न.

प्रकाशन: 03 Dec 2022 04:40 PM
वाचन संख्या 55

५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान’ कणकवली तालुका आणि आम्ही कणकवलीकर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले. कणकवली नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक नाडकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगताना डॉ. विद्याधर तायशेटे यांनी “रक्तदान धर्म” हा स्वभाव बनला पाहिजे. कारण रक्तदान केल्याने कमजोरी येत नाही, उलट आठवडाभरातच आपण दान केलेल्या रक्ताची भरपाई निसर्गाकडून होत असते. रक्तदान करताना आपण मानवतेच्या हिताचे कार्य करीत आहोत हे कायम लक्षात ठेवा. तुमचे रक्तदान दुसऱ्या कोणाचेतरी जीवन समृद्ध करत असते. तरूण वर्गाने वर्षातून दोन वेळा रक्तदान करून मानवतेला प्रोत्साहन करणे आज गरज बनली आहे, असे प्रतिपादन केले. या रक्तदान शिबिरासाठी एच्.डी.एफ्.सी. बँकेचे सहप्रायोजकत्व लाभले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान कणकवलीचे अभिषेक नाडकर्णी, अमोल भोगले, सिद्धी वरवडेकर, सुहासिनी कुलकर्णी, योगेश जाधव यांच्यासह एच्.डी.एफ्.सी. बँकेचे मंगेश जाधव,सिद्धेश लाखण,धनश्री बांदेकर, समृद्धी सावंत, हर्षाली चव्हाण, जितेंद्र ईलकर, संदीप गजोबार, प्रथमेश दळवी यांनी फार श्रम घेतले.
आम्ही कणकवलीकरांच्या वतीने डॉ.विद्याधर तायशेटे, संजय मालंडकर, रूपेश खाड्ये,अशोक करंबेळकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा देत आयोजकांचे कौतुक केले. सिंधुनगरी येथून सिव्हिल हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती महाले, अधिपरिचारीका प्रांजली परब, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मयुरी शिंदे, परिचर नंदकुमार आडकर, वाहनचालक नितीन गांवकर, मदतनीस सुरेश डोंगरे यांनी सहकार्य सेवा दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स