ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>जागतिक एडस् दिनानिमित्त कोकण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन</em>

<em>जागतिक एडस् दिनानिमित्त कोकण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन</em>

प्रकाशन: 01 Dec 2022 06:27 PM
वाचन संख्या 45

बांदा | राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने १ डिसेंबर जागतिक एडस् दिनानिमित्त जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

सावंतवाडी गांधी चौक येथे एडस् या विषयावर पंचम खेमराज महाविद्यालयातील युवकी युवतींनी यावेळी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. यांनतर महाविद्यालयात शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी रक्त तपासणी शिबिराच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात श्री सोन्सुरकर यांनी एडस् दिनानिमित्त मार्गदर्शन केले.


या कार्यक्रम प्रसंगी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, अवंती गवस, कुणाल चव्हाण, प्रथमेश सावंत, प्रदीप पवार, जयराम जाधव तसेच महाविद्यालयाच्या वतीने एन एस एस विभागाचे डॉ.श्री.देविदास बोर्डे, एन सी.सी विभागाचे डॉ श्री.सचिन देशमुख, प्रा. श्रीम. सुनयना जाधव, प्रा. आर. एम.जाधव, प्रा.एम. व्ही.आठवले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी कार्यक्रमाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ICTC विभागाचे समुपदेशक श्री.सुनील सोन्सूरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री अमित लिंगवत, श्रीम.शलाका नाईक, श्रीम. वैभवी बांदेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स