ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधनेत सातत्य ठेवा - प्रभाकर कुडतरकर.

निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधनेत सातत्य ठेवा - प्रभाकर कुडतरकर.

प्रकाशन: 29 Nov 2022 04:56 PM
वाचन संख्या 40

कासार्डेतील शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात आवाहन..

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
प्राचीन काळापासून भारतातील ऋषीमुनींनी योग विद्येचा अभ्यास करून जगाला देणगी दिली आहे. क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योग साधना आहे.निरोगी जीवन जगण्यासाठी प्राणायाम व योगसाधनेत सातत्य ठेवणे काळाची गरज आहे असे आवाहन कासार्डे शिक्षण संस्थाचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी योगा स्पर्धेतील खेळाडूंना केले.
क्रीडा व युवक सेवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एन.सी. कुचेकर,प्र.पर्यवेक्षक एस.डी. भोसले, पंच -प्रकाश कोचरेकर, रवींद्र पावसकर, सौ.श्वैताता गावडे, सौ.निता सावंत, आनंद परब,कु. तेजल कुडतरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून आणि ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शानदार उद्घाटन झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत प्र.प्राचार्य एन.सी.कुचेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

स्पर्धेला क्रीडा शिक्षक श्री.कानूरकर( कट्टा )नरेंद्र पाटकर कोर्ले- धालवली अर्चना देसाई (पेंढूर हायस्कूल) आणि शर्मिला केळूसकर (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली), प्रियंका सुतार,अवधूत कानकेकर (कासार्डे हायस्कूल) आदी उपस्थित होते.

याप्रसंगी योगपंच संजय भोसले,सौ.श्वेता गावडे ,प्र.मुख्याध्याक एस.सी. कुचेकर यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.आभार संजय भोसले यांनी मानले.या जिल्ह्यास्तरीय योगा स्पर्धेला जिल्हातील विविध माध्यमिक शाळेतील खेळाडूंनी हजेरी लावली असून ,ही स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या डीजीटल हाॅल मध्ये सलग दोन दिवस सुरू राहणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स