ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कला तपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निबंध स्पर्धेचे आयोजन.

कला तपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निबंध स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 29 Nov 2022 03:04 PM
वाचन संख्या 42

कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी निबंध स्पर्धा..

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कला तपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, कला तपस्वी आप्पा काणेकर यांनी आपले समग्र जीवन कलेसाठी समर्पित केले होते,त्यांच्या कला सहयोगाच्या स्मृती सदैव जागत्या ठेवाव्यात या उदात्त हेतूने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे, दरम्यान त्यांची सहचारिणी ट्रस्टच्या विश्वस्त उपक्रमशील शिक्षिका उमा काणेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, कै.उमा काणेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील विद्यार्थी शिक्षकांना मिळावी यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे, याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून स्मृतीशेष सौ.उमा काणेकर यांना वैशिष्टयपूर्ण उपक्रमांतून आदरांजली वाहण्यातयेत आहे. 

      यावर्षी, कै.उमा महेश काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. 

निबंध स्पर्धेसाठी गट पहिला- (५वी ते ७वी)साठी  पर्यावरण रक्षण आणि माझी भूमिका, स्वच्छता अभियानात माझी जबाबदारी व प्राणीमात्रांवर दया करा हे तीन विषय असून एका विषयावर २०० ते २५० शब्दांपर्यंत निबंध लिहुन पाठवायचा आहे. 

गट दुसरा (८ वी ते १० वी) साठी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, भारतीय संविधान आणि राष्ट्रीय ऐक्य, वाचन सर्वांगीण समृद्धीचा पाया असे विषय असून यासाठी ४५०ते ५०० शब्द मर्यादा आहे. 

गट तिसरा महाविद्यालयीन (११ वी ते १५ वी) साठी लोकशाही टिकवा, देश वाचवा, समाज प्रबोधनात प्रसार माध्यमांचे कार्य व मतदान माझा अधिकार असे विषय असून ६५० ते ७०० शब्दांची मर्यादा आहे. 

जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षकांसाठी विज्ञानविषयक संशोधनात्मक निबंधलेखन स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी विज्ञान अध्यापनातील माझे नाविन्यपूर्ण उपक्रम (पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गातील कोणत्याही प्राथमिक शाळेतील शिक्षक सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतात) असा विषय ठेवण्यात आला आहे. 

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना नियोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले निबंध खालील पत्त्यावर दिनांक १५ डिसेंबर २०२२ पुर्वी कल्पना मलये (9673438239) जि. प. शाळा कणकवली क्र. ५, शिवाजी नगर कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे पाठवावेत.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश कदम-9423832692/7057383982 यांच्याशी संपर्क साधावा. तरी कै. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेऊन कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या स्तुत्य उपक्रमाला सहयोग द्यावा असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स