ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विभागीय क्रिकेट स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन,मालवण संघ विजेता.

विभागीय क्रिकेट स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन,मालवण संघ विजेता.

प्रकाशन: 27 Nov 2022 12:20 PM
वाचन संख्या 213

मसुरे | प्रतिनिधी :
आंतर अभियांत्रिकी पदविका विभागीय विद्यार्थी क्रिडा स्पर्धा बी-1, झोन,कोल्हापूर अंतर्गत “क्रिकेट” स्पर्धा संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे या ठिकाणी नुकतीच पार पडली. या स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन,मालवण या संघाने विजेतेपद पटकाविले. उपांत्य फेरीत संजय घोडावत पॉलिटेक्निक तर अंतिम सामन्यात महागाव पॉलिटेक्निक संघाचा पराभव केला. प्रत्येक सामन्यात अवघ्या १० षटकांमध्ये १०० पेक्षा जास्त धावा जमवण्याचा पराक्रम मालवण पॉलिटेक्निकच्या फलंदाजांनी केला. आता पुणे येथे ८ व ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होईल. सदर संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून श्री. प्रशांत आखूड व किशोर कांबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रा.बडेकर व प्रा.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.


सर्व स्पर्धकांचे शासकीय तंत्रानिकेतन,मालवणचे प्राचार्य, डॉ.एस.ए.पाटील, उपाध्यक्ष प्रा. डी. एन. गोलतकर व संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. पी.एस.थोरात यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स