ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड.

साउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड.

प्रकाशन: 27 Nov 2022 12:14 PM
वाचन संख्या 41

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
वर्ल्ड कराटे फेडरेशन च्या मान्यतेने साऊथ एशियन कराटे फेडरेशनच्या वतीने दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान श्रीलंकेतील कोलोंबो येथे होत असलेल्या “साउथ एशियाई कराटे स्पर्धा २०२२” साठी महाराष्ट्रातील मंथन भोकरे, कार्ल वाच्छा, रिचा सेठ व भुवनेश्र्वरी जाधव यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

सदर भारतीय संघासाठी स्पर्धा पुर्व राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १३ ते २४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान डेहराडून येथे आंतरराष्ट्रीय विजेते प्रशिक्षक श्री. हमेद झिकसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. भारतीय संघ 26 नोव्हेंबर २०२२ रोजी थेट तिथूनच स्पर्धेसाठी श्रीलंकेसाठी रवाना होणार
आहे.

सदर स्पर्धेसाठी आपले महाराष्ट्रचे वर्ल्ड कराटे फेडरेशन मान्यताप्राप्त पंच शाहीन अख्तर व अनुप देठे यांची देखील सदर स्पर्धेसाठी भारतातर्फे जाणार्‍या संघात पंच म्हणुन निवड झाली आहे.

सदर स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना व पंचांना कराटे इंडिया ऑर्गनायझेशन(KIO) ची मान्यता असेलेल्या कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM) या राज्य संघटनेचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, सचिव संदीप गाडे व खजिनदार संदिप वाघचौरे यांनी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स