ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पावणाई देवी दूध उत्पादन संस्थेच्या माध्यमातून मसुरेत दूध व्यवसाय प्रशिक्षण शिबिर संपन्न…!

पावणाई देवी दूध उत्पादन संस्थेच्या माध्यमातून मसुरेत दूध व्यवसाय प्रशिक्षण शिबिर संपन्न…!

प्रकाशन: 21 Nov 2022 05:19 PM
वाचन संख्या 100

मसुरे | प्रतिनिधी :
दूध उत्पादन हा शाश्वत रोजगार असून या रोजगारातून येथील शेतकरी समृद्ध बनणार आहे. यासाठी शेतकऱ्याने तन मन धन अर्पून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या पाळीव जनावरांची काळजी आपल्या कुटुंबाप्रमाणेच घेऊन हा व्यवसाय केल्यास निश्चितच येथील शेतकऱ्यांमध्ये अनोखी क्रांती घडेल असे प्रतिपादन मसुरे येथे बोलताना भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर देवधर यांनी केले.

पावणाई देवी दूध उत्पादन संस्था मसुरे आणि गोकुळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मसुरे परिसरातील दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर मसुरे मर्डे येथील भरतगड इंग्लिश मीडियम च्या सभागृहात पार पडले. याचे उद्घाटन मर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश गावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुका अध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गोकुळ संकलनचे असिस्टंट मॅनेजर पी एस तेलवेकर, मायक्रो ट्रेनिंग सेंटर टीरवे चे संचालक सागर किल्लेदार, गोकुळ सुपरवायझर श्रीयुत गावकर, आबा मडवळ सतीश बांदिवडेकर, बांदीवडे माजी उपसरपंच किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर विश्वास साठे म्हणालेत येथील शेतकरी हा दूध उत्पादनातून सधन झाला पाहिजे यासाठी मसुरे येथील पावणाई देवी दूध उत्पादक संस्था या सर्व शेतकऱ्यांच्या मागे सदैव राहणार असून या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे जे प्रयत्न करावयाचे असतील ते सर्व प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केले जातील. भविष्यातही या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.

यानंतर या प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक सागर किल्लेदार यांनी मार्गदर्शन करताना विविध जातीच्या म्हशींची जोपासना कशा पद्धतीने करावी, तसेच जास्तीत जास्त दूध उत्पादन होण्यासाठी जनावरांची कशाप्रकारे काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली. भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर देवधर यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त अशा बायोगॅस आणि दूध उत्पादन करताना आधुनिक पद्धतीने उत्पादन कशा पद्धतीने करता येईल याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देऊन येथील शेतकऱ्यांनी एक गट तयार करून जेव्हा जेव्हा भगीरथ प्रतिष्ठानच्या वतीने या शेतकऱ्यांना जे सहकार्य लागेल ते देण्याचे आश्वासन यावेळी डॉक्टर देवधर यांनी दिले. दोन सत्रात सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिराला मसूरे येथील सुमारे 100 शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनीही दूध उत्पादनासंबंधीत विविध प्रश्न मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी वर्गाला करून माहिती करून घेतली. यावेळी या संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका साठे यांनीही संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. सर्व उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शेवटी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी किशोर त्रिंबककर, मनोज पाटील, उमेश परब, महेंद्र किल्लेदार, नारायण परब, पुष्पक चीदरकर, शिवराम घाडीगावकर, विनय घाडीगावकर ,महादेव पवार, पांडुरंग ठाकूर, मुबारक शेख, संतोष घाडीगावकर, अभी घाडीगावकर, सिद्धेश मसुरकर, सुमित सावंत, अभी दुखंडे, मारुती सावंत, स्वप्निल ठाकूर, निलेश लोके आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल सभागृह येथील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने डॉक्टर साठे यांनी भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल चे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पावणाई देवी महिला दूध उत्पादन संस्थेच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले होते सर्व मान्यवरांचे आभार पांडुरंग ठाकूर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स