ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सरस्वती विद्यामंदिर कुवळे नंबर १ शाळेचे दैदिप्यमान यश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सरस्वती विद्यामंदिर कुवळे नंबर १ शाळेचे दैदिप्यमान यश..!

प्रकाशन: 21 Nov 2022 05:12 PM
वाचन संख्या 122

राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेत चार सुवर्ण व दोन रौप्य पदक.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेत देवगड तालुक्यातील कुवळे नंबर १शाळेतील विद्यार्थ्यांनी चार सुवर्ण व दोन रौप्य पदक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांनी घेतलेल्या विविध स्पर्धेत शाळेतील 30 मुलानी सहभाग घेतला होता. त्यापैकी रंगभरण स्पर्धेत भार्गव लाड व दिव्या परब यांनी सुवर्णपदक, कोलाज प्रकारात गौरव कावले यांनी सुवर्णपदक तर प्रेम लाड याने रौप्य पदक, हस्ताक्षर स्पर्धेत भार्गव लाड यांनी सुवर्णपदक तर वेदिका बागवे हिने रौप्य पदक पटकावले आहे . सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री कुंभार सर, श्री शेटये सर,श्री भुजबळ सर शाळेचे मुख्याध्यापक श्री परब सर यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे सौ.संगीता कदम ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमूल परब , श्री रत्नदीप कुवळेकर ,सौ.अमृता लाड,सौ आचल लाड तसेच इतर ग्रामस्थ इत्यादीनी अभिनंदन करून पुढे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स