ओरोस येथे पतंजली योग वर्गाचे आयोजन…!
ओरोस | ब्यूरो न्यूज : पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस शहरामध्ये आज पतंजली योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाचे उद्घाटक ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालय चे प्रो. आनंद सावंत होते. यावेळी शेखर बांदेकर पतंजली योगसमिती उपजिल्हा प्रभारी, तुळशीराम रावराणे पतंजली योगसमिती जिल्हा प्रभारी, आनंद परब युवा जिल्हा प्रभारी, प्रो. विवेक राणे, सैनिक फेडरशन चे जिल्हा अध्यक्ष परब, कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी योग वर्गामध्ये लक्षणीय उपस्थिती होती. सर्वसाधारकांनी सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम असा अभ्यास केला उद्यापासून योग वर्ग सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेस दररोज सुरू राहील. कर्नल सुधीर सावंत यांनी रोगमुक्त होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओरोस मधील सर्व नागरिकांनी या योग वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)