ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मानव साधन विकास संस्थेच्यावतीने परीवर्तन केंद्रामार्फत वेंगुर्ले येथे ४० शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप…..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मानव साधन विकास संस्थेच्यावतीने परीवर्तन केंद्रामार्फत वेंगुर्ले येथे ४० शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप…..!

प्रकाशन: 21 Nov 2022 10:49 AM
वाचन संख्या 37

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या व विद्यमान अध्यक्ष सौ.उमा प्रभु असलेल्या मानव साधन विकास संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्याना मोफत चष्मा वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले होते. वेंगुर्ले तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी सिव्हील हॉस्पिटलतर्फे करणेत आली होती. या तपासणीत ५३ विद्यार्थ्याना नेत्र दोष मिळाला होता. त्या सर्व विद्यार्थ्याना परीवर्तन केंद्रामार्फत सौ. उमा प्रभु यांच्या सहकार्याने मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २२००० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी सिव्हील हॉस्पिटलकडुन करणेत आली , त्यातील ७५० नेत्र दोष असलेल्या विद्यार्थ्याना मानव साधन विकास संस्थेमार्फत मोफत चष्म्याचे वाटप करणे आले.

परीवर्तन केंद्रामार्फत वर्षभरापुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महीलांना १०० स्थानिक संस्थाचे मार्फत १००० मोफत शिलाई मशिनचे वाटप करणे आले होते, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११४ शाळातील १००० मुलीना मोफत सायकल वाटप करणे आले होते.

नेत्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी योग्यवेळी केल्याने व त्यांच्या असलेल्या नेत्र दोषाप्रमाणे, त्यांना योग्य चष्मा मिळाल्याने व त्यांचा योग्य वापर मुलांनी केल्यास त्यांना आलेला नेत्रदोष आगामी काळात दुर होऊ शकतो, तसेच नेत्र दोष दुर झाल्याने त्यांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन काॅनबॅकचे मोहन होडावडेकर यांनी चष्मा वितरण कार्यक्रम प्रसंगी केले.

यावेळी परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, ग्रामीण रुग्णालयाच्या डीसोझा सिस्टर, या.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, बुथप्रमुख शेखर काणेकर, युवा मोर्चाचे दशरथ गडेकर, कार्यकर्ते राजु सामंत तसेच वेंगुर्ले तालुक्यातील विद्यार्थी व पालक व शिक्षक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स