ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सुनिल तळेकर यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सुनिल तळेकर यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन…!

प्रकाशन: 13 Nov 2022 03:43 PM
वाचन संख्या 30

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम २५ व २६ नोव्हेंबरला तळेरे येथे होणार आहेत, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेली २५ वर्षे स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षी २५ व्या स्मृतीदिना निमित्त २५ नोव्हेंबर ला सकाळी १० ते ४ वा. या वेळेत डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने विविध आजारांवर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे होणार आहे. यामध्ये विविध १५ आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार असून २४ नोव्हेंबर पर्यंत तळेरे, दारुम, ओझरम, साळिस्ते, शिडवणे, कासार्डे, वारगाव, गवाणे, बुरंबावडे, शिरवली, नाधवडे येथील प्रतिनिधींकडे नोंदणी करावी. यामध्ये तपासणी करणाऱ्या नागरिकांनी पुर्वीच्या आजारांच्या तपासणीचे अहवाल घेऊन यावेत. 
शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. एस. एस. पी. एम. रुग्णालय पडवे यांच्या सहकार्याने विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर होणार आहे. त्यानंतर १० वा. स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन राज्य शासनाचे माजी (शिक्षण) संयुक्त सचिव आणि दळवी महाविद्यालयाचे संस्थापक सल्लागार प्रा. विनायक विश्वनाथ दळवी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ११ वा. शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांसाठी श्री. विठ्ठल रखुमाई मन्दिर तळेरे गावठण येथे शेतकरी मेळावा होणार आहे. यावेळी शेतीमधील तज्ञ मार्गदर्शन करणार असून या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि सुनिल प्रेमीकडून करण्यात आले आहे. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स