शिरगांव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर सत्यविजय चव्हाण यांचे निधन...!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील शिरगांव – आंबेखोल येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर तथा शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मानद अधीक्षक सत्यविजय(दादा) लक्ष्मण चव्हाण (७९) यांचे शनि. दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली, दोन बहिणी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिरगाव बाजारपेठेतील शुभम शॉपी चे मालक शैलेश चव्हाण यांचे ते वडील होत. तसेच मुंबई महानगर पालिकेचे सेवानिवृत्त अभियंता ज्ञानदेव लब्दे यांचे ते मेव्हणे होत. अतिशय मितभाषी, शांत स्वभावाचे आणि समाजप्रिय म्हणून ते ओळखले जायचे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)