ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आचरा येथे १५ नोव्हेंबरला वीज ग्राहक मेळावा…..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आचरा येथे १५ नोव्हेंबरला वीज ग्राहक मेळावा…..!

प्रकाशन: 13 Nov 2022 03:52 PM
वाचन संख्या 55

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (सिंधुदुर्ग मंडल) उपविभाग-आचरा आयोजित तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग व व्यापारी संघटना आचरा यांच्या सहकार्याने प्रथमच मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी ‘लौकिक सांस्कृतिक भवन’ (हाँटेल सीराँक शेजारी) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी आचरा येथे प्रथमच “विज ग्राहक मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.


या मेळाव्यात वीज बिला बाबत तक्रारी, बंद असलेले पथदिप, वाढिव विज बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, महावितरणच्या विविध योजना या आणि अशा अनेक तक्रारींचा तात्काळ निकाल करण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी ग्राहकांनी आपल्या मनातील शंका-कुशंका, गैरसमज, तक्रारी मांडाव्यात व सर्वांनी मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन वामन आचरेकर-अध्यक्ष व्यापारी संघटना आचरा, वाळके-सचिव सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना व प्रसाद पारकर-अध्यक्ष सिंधुदुर्ग व्यापारी संघटना यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स