ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्लेच्या संगीत क्षेत्रात भर घालणाऱ्या " तालविश्व संगीत विद्यालयाचे " मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्लेच्या संगीत क्षेत्रात भर घालणाऱ्या " तालविश्व संगीत विद्यालयाचे " मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन…..!

प्रकाशन: 13 Nov 2022 12:26 PM
वाचन संख्या 104

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावातील हरिचरणगीरी तिठा येथे श्री गणेशमूर्ती कलाआकार केंद्रामध्ये “तालविश्व संगीत विद्यालयाचा” शुभारंभ भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वायंगणी सरपंच सुमन कामत, खानोली सो.सा.चेअरमन प्रशांत खानोलकर, सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे प्रकाश आकेरकर, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


हरिचरणगीरी येथील युवा कलाकार अनंत मठकर यांच्या संकल्पनेतून व पखवाज मध्ये एम.ए.ची पदवी घेतलेले मनिष तांबोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पखवाज वादन तसेच तबलावादन शिकवले जाणार आहे. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार परिक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
संगीत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम या संगीत विद्यालयातून होते हे अभिमानास्पद आहे. सध्याच्या आधुनिक युगात युवा पिढी व्यसनाधीन होत असताना संगिता सारख्या कले कडे युवा वर्ग आकृष्ट होत आहे. हे सुद्धा भुषणावह आहे. तसेच ही कला जोपासण्यासाठी अशा संगीत विद्यालयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी प्रसंन्ना देसाई यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अनंत मठकर यांनी केले. यावेळी सचिन नाईक, अमोल आकेरकर, शुभम करंगुटकर, मठकर इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स