सावंतवाडी येथे तब्बल ९.५ फुटी अजगराला जीवदान….!
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील सालईवाडा येथे भक्ति हॉस्पिटल जवळील श्री परब यांच्या अंगणात रात्री १२.०० वाजता ९.५ फुटी अजगर निदर्शनास आला व लगेचच सावंतवाडी येथील सर्पमित्र श्री. नवीद हेरेकर यांना संपर्क करण्यात आले . एवढ्या रात्री देखील श्री हेरेकर यांनी आपण स्वीकारलेली सर्प व पर्यावरण रक्षणाची जबाबदारी निष्ठेने पार पाडत अवध्या १० मिनिटात तेथे पोहचत मोठ्या शिताफितिने त्या अजगराला कोणतीही दुखापत न होता पकडले व लगेचच सावंतवाडी येथील वन विभागाकडे सुपुर्द केले. तेथील सर्व उपस्थितितांनी हेरेकर यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!