जानवली बौद्ध विकास संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'शाळा प्रवेश दिन' उत्साहात साजरा..!
मसुरे | प्रतिनिधी :
विश्वरत्न, बोधिसत्व नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शाळा प्रवेश दिन’ विद्यार्थी दिवस म्हणून जानवली बौद्ध विकास संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने कणकवली तालुका संघटनेचे बौद्धाचार्य डी.के. जाधव. (फोंडाघाट) यांच्या धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म प्रवचनात वर्षातील बारा महिन्यांच्या पौर्णिमांचे विशेष अतिशय समर्पक शब्दात व सोप्या भाषेत सांगितले. कास्ट्राईब संघटनेचे महासचिव किशोर कदम सर यांनी ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रंथालयासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महामानवांच्या जीवनावर आधारीत १० पुस्तकांचे धम्मदान करणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष दीपक कदम यांनीही उपस्थितांना पौर्णिमा दिनाच्या व विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.माता रमाई महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी काव्य रूपात बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व धम्म बंधू आणि भगिनींनी उत्तम प्रकारे सहकार्य व साथ दिली. धम्माचा विचार व धम्माचरण उत्तम प्रकारे करून आपण आपले जीवन दैदीप्यमान करूया असे मनोगत प्रियांका कदम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कदम तर प्रास्ताविक संदीप कदम यांनी मांडले. या कार्यक्रमाला अशोक कदम,विलास कदम,संतोष कदम,अनिल कदम,महेश कदम,संदेश कदम,मृणाली कदम,अर्चना तांबे,साधना पवार,चैतन्य पवार,अस्मिता कदम,प्रदीप पवार यांची उपस्थिती होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)