ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नाधवडे ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सौ.शैलजा सुतार यांची बिनविरोध निवड...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नाधवडे ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सौ.शैलजा सुतार यांची बिनविरोध निवड...!

प्रकाशन: 10 Nov 2022 05:24 PM
वाचन संख्या 72

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
भाजपचे बहुमत असलेल्या नाधवडे ग्रामपंचायत नूतन सरपंचपदी सौ. शैलजा मनोहर सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सन २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच जागेसाठी यापूर्वी सौ. आदिती अनिल नारकर यांनी सरपंचपद भूषवले होते. त्यानंतर  दुसरी संधी म्हणून नाधवडे नवलादेवीवाडीतील ग्रामपंचायत सदस्य सौ शैलेजा मनोहर सुतार यांना सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. 
नाधवडे गावातील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सर्वांना संधी मिळावी म्हणून पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सरपंच पदाच्या मुदतीमध्ये विभागणी करून संधी देण्याचे ठरवले होते. त्यानुसार आता ही संधी शैलेजा मनोहर सुतार यांना देण्यात आली. यावेळी  नुतन सरपंच यांचा सत्कार नाधवडे गावातील औदुंबर सेवा स्ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, माजी तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे, परशुराम ईस्वलकर, महेश गोखले, अनिल नारकर, माजी सरपंच अदिती नारकर, उपसरपंच सूर्यकांत कांबळे, रवींद्र गुंडये, दीपक पार्टे,  रमाकांत पांचाळ, संतोष पेडणेकर, संतोष यादव, बाबू तावडे, ग्रामपंचायत सदस्य लीना पांचाळ, ऋतुजा यादव, श्रीरंग पावसकर, गोपाळ कोकाटे, संजय पेडणेकर, रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते. 
नाधवडे गावातील  इतिहासामध्ये नवलादेवी वाडीतील ग्रामपंचायत सदस्याला प्रथमच सरपंच पद मिळण्याचे भाग्य सौ शैलेजा मनोहर सुतार यांना मिळाले आहे. त्यामुळे नवलादेवी वाडीतील ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. त्यांचे नवलादेवीवाडीत जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सर्व कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी आभार मानले व यापुढेही अशाच बिनविरोध निवडणूक व्हाव्या यासाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स