ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे संगीत विद्यालयाचा शुभारंभ...!

कट्टा येथे संगीत विद्यालयाचा शुभारंभ...!

प्रकाशन: 10 Nov 2022 01:40 PM
वाचन संख्या 56

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथील बॅ नाथ पै सेवांगण येथे गीता नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत
पंडित वामनराव काराणे संगीत विद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी वैष्णवी लाड यांनी या संगीत विद्यालयाची माहिती दिली. इतर उपक्रमा प्रमाणेच हाही उपक्रम यशस्वी करण्याचा मानस त्यानी व्यक्त केला.
दीपक भोगटे म्हणाले, पंडित वामनराव काराणे यानी वयाच्या ८५ वर्षा पर्यंत अत्यंत अल्प मोबदल्यात अनेक विद्यार्थ्याना संगीताचे शिक्षण दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विद्यालयाला काराणे सरांचे नाव दिले आहे. या विद्यालयाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आवाहन केले.
अर्जून पेंडूरकर यांनी आजचा दिवस आमच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असून काराणे सरांच्या नावाच्या विद्यालयात काम करणे म्हणजे भाग्यच समजतो असे प्रतिपादन केले. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्या बद्दल सेवांगणास धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी रवीना पांजरी हिने मुरलीधर श्यामसुंदर, पद्मनाभा नारायणा, वृंदावनी खेळूया गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.अर्जून पेंडूरकर यांच्या नेतृत्वाखाली
अर्जून पेंडूरकर तबला,रवीना पांजरी गायन,प्रतिक कोतिवडेकर हार्मोनियम
शिकवणार आहेत.

या कार्यक्रमास किशोर शिरोडकर बापू तळावडेकर सुनील गुराम दीपक भोगटे ,वैष्णवी लाड ,गीता नाईक ,प्रियांका भोगटे भगवान काळसेकर सुजाता पावसकर ,श्रीधर गोंधळी, श्री चव्हाण शिवण क्लासच्या विद्यार्थीनी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स