ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात मनसे तर्फे मोफत गीत संगीत रजनीचे आयोजन..!

मालवणात मनसे तर्फे मोफत गीत संगीत रजनीचे आयोजन..!

प्रकाशन: 10 Nov 2022 11:37 AM
वाचन संख्या 490

मुंबईतील स्वर सागर ऑर्केस्ट्रा सादर करणार सदाबहार गीते.

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर व सहकार्यांचे आयोजन.

Article image

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या ११ नोव्हेंबरला रात्री ९:३० वाजता एका विशेष सांस्कृतिक मनोरंजन मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. सागर कांबळी स्वरसागर या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण मामा वरेरकर नाट्यगृह येथे होत असून याचे निर्माते बाळा कांबळी,संगीत संयोजक सागर कांबळी आणि मुंबई जोगेश्वरीचे नामवंत कलावंत याचा हिस्सा आहेत. यांत हिंदी व मराठीतील सदाबहार गीतांचे सादरीकरण होणार आहे.
ही विशेष गीत संगीत रजनी मालवणच्या रसिकांसाठी संपूर्ण मोफत आहे.
मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण मनसे शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी याचे आयोजन केले आहे.

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका अध्यक्ष विनोद सांडव , उप तालुकाध्यक्ष उदय गावडे, म न वि से माजी जिलाध्यक्ष अमित इब्रामपुरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,महिला शहर अध्यक्ष भारती वाघ , म.न.वि.से. तालुका अध्यक्ष संदीप लाड,म
न.वि.से. शहर अध्यक्ष वैभव माणगांवकर, संकेत वाईरकर, मनसे उपशहर अध्यक्ष गुरू तोडणकर तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व मनसे,म.न.वि.से. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली असल्याची माहिती शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे.

या नामवंत ‘स्वर सागर’ ऑर्केस्ट्राच्या सादरीकरणाला जास्तीतजास्त संख्येने रसिकांनी उपस्थिती दर्शवून गीत संगिताचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मनसे शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी मनसेतर्फे केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स