ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ॲडलेड ओव्हल…ॲड द स्पाईस ॲन्ड लीड द वर्ल्ड..!

ॲडलेड ओव्हल…ॲड द स्पाईस ॲन्ड लीड द वर्ल्ड..!

प्रकाशन: 10 Nov 2022 04:12 AM
वाचन संख्या 806

क्रीडा विशेष | २०२२ टी ट्वेंटी विश्वचषक : आज भारत विरुद्ध इंग्लंड असा टी ट्वेंटी विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ॲडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे.

२००३ सालापासून भारतीय संघासाठी सलगपणे यशस्वी ठरलेल्या परदेशी मैदानांपैकी एक मैदान म्हणजे ॲडलेड ओव्हल आहे. पण याचा अर्थ ॲडलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघ भाग्यवान वगैरे ठरतो असे नाही तर या मैदानात मिळवलेल्या प्रत्येक विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाला एकत्रीत होऊन संघर्ष करुन विजय मिळालेला आहे आणि तो प्रत्येक विजय अभिमानास्पद आहे हे वास्तव आहे.


२००३ साली द्रविड,लक्ष्मण, तेंडुलकर व आगरकर यांच्या एकत्रीत प्रयत्नांनी ते साकार झाले होते…नंतर पुढे जाऊन विराट कोहलीसाठी ॲडलेड ओव्हल मैदानावर एक वेगळी ऊर्जा जाणवू लागली आणि आता ॲडलेड ओव्हल मैदान अगदी घरचे मैदान वाटू लागले आहे.

आज काळ बदललाय..क्रिकेट खेळाच्या नियमांसकट त्याचे सादरीकरण बदलले आहे. इतिहास व भविष्य यांचा विचार न करता ‘फक्त आजचा सामना’ यांवर विचार करुन खेळाडू कृती करत असतात. भारतीय संघाला रोहीत शर्माच्या रुपाने एक नैसर्गिक कर्णधार लाभलेला आहे. जो स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकाच दबावाखाली खेळतो. थोडक्यात तो क्रिकेट खेळतो पण क्रिकेटच्या स्तराचे व दडपणाचे ओझे घेऊन खेळत नाही.

इंग्लिश संघासाठी गेली ५ वर्षे ही थोडी वरचढ आहेत पण शेवटी तो ही इतिहासच आहे. बटलर सारखा शैलीदार मुक्त फलंदाज व कर्णधार त्यांच्याकडे आहे. बाकिचे खेळाडू सुद्धा आपापली कामगिरी उत्तम सांभाळतात.

दोन्ही संघात सगळं बरोबरीचे आहे…पण भारतीय संघाकडे दोन गोष्टी थोड्या अधिक आहेत..पहिली म्हणजे ॲडलेड वरचा विराट कोहली आणि दुसरा म्हणजे तळपणारा सूर्यकुमार यादव..!

ॲडलेडवरील आजच्या सामन्यात तोच अधिकचा ‘स्पाईस’ ॲड होऊन भारताला ट्राॅफी साठी हे घटक लीड करतील हीच तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे.

ॲडलेड ओव्हल…ॲड द स्पाईस ॲन्ड लीड द वर्ल्ड..!

(आपली सिंधुनगरी चॅनेल विशेष)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स