शिरगांव हायस्कूल शिरगांवच्या संगणक प्रयोगशाळेला मानसी कोरगांवकर यांच्याकडून १६ संगणक सप्रेम भेट…!
शिरगांव | संतोष साळसकर :
मानसी कोरगावकर ( अमेरिका) यांनी आपल्या आजी सुलभा काणेकर यांच्या स्मरणार्थ शिरगाव हायस्कूल च्या संगणक प्रयोगशाळा १६ संगणक with networking ( किंमत रु ५ लाख १६ हजार मात्र) आज प्रदान केले. या वेळी मानसी कोरगावकर यांचे वडील शेखर कोरगावकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास कार्याध्यक्ष राजन चव्हाण, प्राचार्य एस.एन. अत्तार, शाळा अधीक्षक रवींद्र जोगल, संस्था संचालक संदीप धोपटे, गणपत तावडे, शाळा समिती सदस्य मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, तसेच संस्था सदस्य सुधीर साटम, दिलीप पाळेकर, दिनेश साटम, महेश चौकेकर , राजेंद्र शेट्ये व इतर सर्व उपस्थित होते.
या वेळी मानसी कोरगावकर , त्याचे वडील शेखर कोरगावकर यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष राजन चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मानसी कोरगावकर यांनी शाळेस दिलेल्या ह्या अनमोल देणगी बद्दल शाळा व संस्था यांनी त्यांचे विशेष आभार मानले .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)