ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार…!

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार…!

प्रकाशन: 09 Nov 2022 08:01 PM
वाचन संख्या 42

चिंदर | विवेक परब :
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, ओरस येथे केल्याबद्दल भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे ग्रामपंचायत व तुळस आरोग्य केंद्रात भाजपाच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही शिबिराचा जवळ जवळ २६० ग्रामस्थांनी सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी करून घेतली होती . त्या शिबिरातील ज्या रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते , अशा रुग्णांची शस्त्रक्रिया ओरस येथे जिल्हा रुग्णालयात ऑक्टोंबर मध्ये करण्यात आली . यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील ६० लोकांची मोफत शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून यशस्वी केली. त्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला. जे रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करु शकत नव्हते, त्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा भाजपा च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई यांच्या सोबत भाजपा जिल्हा चिटणीस व माजी सभापती निलेश सामंत, जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, वेंगुर्ले भाजपचे ता.उपाध्यक्ष व कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, तुळस शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, युवा मोर्चा ता.सरचिटनीस नारायण कुंभार इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स