ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
लाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे २६ नोव्हेंबरला देवगड येथील डॉ. आठवले कॅम्पस येथे मेंदू विकाराच्या रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

लाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे २६ नोव्हेंबरला देवगड येथील डॉ. आठवले कॅम्पस येथे मेंदू विकाराच्या रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर...!

प्रकाशन: 07 Nov 2022 05:59 PM
वाचन संख्या 37

शिरगांव | संतोष साळसकर :
लाईफ लाईन फाऊंडेशन तर्फे दरवर्षी देवगड तालुक्यात अनेक लोकोपयोगी वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात.आत्तापर्यंत लाईफ लाईन फाउंडेशन तर्फे 800 पेक्षा अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी 9.30 ते 12.30 या वेळात डॉ आठवले कॅम्पस येथे मेंदूच्या विकाराच्या रुग्णांसाठी एक मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे.
अर्धशिशी , मेंदूत गाठी असणे, लकव्याचे रुग्ण,इतर मेंदूचे आजार, पूर्वी ज्यांची डोक्याची शस्त्रक्रिया झाली असेल रूग्ण.स्मृतीभ्रंश असणे, मणक्याचे आजार, मणक्याचे ऑपरेशन झालेले रुग्ण ,गरगरणे चक्कर येणे हे लक्षणे असलेले रुग्ण यांची ह्या शिबिरात मोफत तपासणी होईल. कृपया येताना आपले पूर्वीचे सर्व रिपोर्ट घेऊन यावे. पूर्व नोंदणी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येईल. आवश्यक त्या रुग्णांची डोळ्यांची ही तपासणी मोफत करण्यात येणार आहे .या शिबिरासाठी रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ.विजय फडके हे उपस्थित राहणार आहेत. तरी जास्ती जास्त गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लाईफ लाईन फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स