ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बापार्डे - जुवेश्वर येथील यशवंतराव राणे माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचा ९ नोव्हेंबरला उद्घघाटन सोहळा…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बापार्डे - जुवेश्वर येथील यशवंतराव राणे माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचा ९ नोव्हेंबरला उद्घघाटन सोहळा…!

प्रकाशन: 07 Nov 2022 05:43 PM
वाचन संख्या 65

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील बापर्डे जुवेश्वर येथील यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा औपचारिक उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक 9 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुप्रसिध्द लेखिका, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री सुधा मुर्ती यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बापर्डे येथील आप्पा देऊ घाडिगावकर विद्यानगरी प्रागंणात होणार आहे.माजी आमदार स्व. अमृतराव राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ गेली 10 वर्षे कार्यरत असून प्रगतीपथावर आहे. राज्य शासनाकडून 6 वी ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम स्वयं अर्थसहाय्य तत्वावर चालविण्यास मान्यता दिलेली आहे. या संस्थेच्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेजचा औपचारिक उद्घाटन सोहळा यावेळी होणार आहे. 
या कार्यक्रमाला पद्मश्री सौ. सुधा मुर्ती, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जसलोक हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. सुरेश जोशी आणि भारतीय नौदलातील अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी सकाळी 9 ते 10 वा. सत्यनारायण महापूजा, 10 ते 12 वा. सौ. सुधा मुर्ती व नौदलातील अधिकार्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व गप्पागोष्टी, सायंकाळी 4.30 ते 8 वा. उद्घाटन सोहळा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
या संपूर्ण कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स