ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एका लग्नाची गोष्ट….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

एका लग्नाची गोष्ट….!

प्रकाशन: 07 Nov 2022 06:36 PM
वाचन संख्या 55

असलदेत आजोबांचा नाविन्यपूर्ण लग्नसोहळा…..!

 शिरगांव | संतोष साळसकर :
स्वस्तिक फाउंडेशन संचालित असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात तुळशी विवाहाला नाविन्यपूर्ण आजोबांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचा आनंद सर्व आजी आजोबा आणि कर्मचार्यांनी घेतला. 

या वृध्दाश्रमात सर्वच सण, उत्सव आनंदाने व उत्साहपूर्वक वातावरणात साजरे केले जातात. हे सण, उत्सव साजरे करण्यामागे हाच मुख्य हेतु आहे कि अशा दुर्लक्षित घटकांना दिविजा वृद्धाश्रमाच्या छताखाली प्रकाशाची नविन वाट, नवी उमेद, नात्यांचे नविन रेशीमबंध घट्ट करता करता मनोरंजन व निखळ आनंद मिळाला पाहिजे. त्यामुळे दरवर्षी दिविजा वृध्दाश्रमातील आजी-आजोबांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होते. 

तुळशी विवाह हा सण आपल्या ग्रामीण भागात अगदी आनंदात व जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या वृध्दाश्रमात आगळ्यावेगळया पध्दतीने लग्नसोहळा पार पडला. यावेळी तुळशी सोबत अविवाहित असलेल्या आजोबांचे लग्नसोहळा अगदी विधीवत करण्यासाठी लग्नपत्रिका छापून व त्या वितरीत करून, तुळशी वृंदावनाला छान शालू, दागिने, बाशिंग, मुंडावळी बांधून नवरीचे रूप दिले व आजोबांना नवरदेव करून लग्नसोहळा करण्यात आला. या सोहळ्याची सुरूवात तांदूळ निवडणे, हळद लावणे, निम्म सांडणे, घाणा पूजन करत पारंपरिक वेशभूषा करून बाशिंग , मुंडावळ्या बांधून सनई चौघडाच्यात तालात अंतरपाटासमोर उभे करून सर्व मानापानासहित करवली व मामाच्या नात्यासह मंडप, सनई चौघडा, मंगलाष्टके, अक्षतांचा भडिमार करत फटाक्याच्या धामधुमीत अगदी विधी स्वरूप लग्न लावले. अश्या या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद अनुभवण्यासाठी कणकवली येथून नाडकर्णी कुटुंबीय व ठाणा मुलुंड येथील पराडकर कुटुंबीय उपस्थित होते. 

आश्रमातील संचालक श्रीमती दिपिका रांबाडे व संदेश शेट्ये, सर्व कर्मचारी वर्ग यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. हा लग्नसोहळा या जन्मी “याची देहि, याची डोळा” पाहण्यास मिळाला असे उद्गार आजी-आजोबांनी काढले. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स