ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र संचलित नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट तर्फे चाफेड गावठण येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र संचलित नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट तर्फे चाफेड गावठण येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार...!

प्रकाशन: 06 Nov 2022 07:21 PM
वाचन संख्या 58

शिरगांव | संतोष साळसकर :
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र संचलित नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट मार्फत देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आली.
हे आरोग्य तपासणी पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात भेट देऊन रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात येतात या आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटणकर, औषध निर्माण अधिकारी जुगल आजगावकर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ रुपेश नाईक, वाहन चालक अक्षय आसोलकर हे उपस्थित होते.
आजही ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप, कावीळ, मधुमेह, रक्तदाब, डोकेदुखी,अंगदुखी, तसेच विविध अलर्जीची रोग अशा अनेक आजारामध्ये वैद्यकीय सेवेअभावी उपचार घेताना अनेक रुग्णाची खूपच हेळसांड होते. काही गरीब रूग्ण आर्थिकदृष्ट्या औषधोपचार घेण्यास हतबल असतात. मात्र या नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट मार्फत मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचारही मोफत केले जातात याबद्दल या रुग्णांनी, ग्रामस्थांनी या युनिट चे विशेष आभार मानले.
यावेळी माजी सरपंच संतोष साळसकर, ग्रा. पं. सदस्य महेश राणे, आशा स्वयंसेविका सौ. प्रणिता राणे, जेष्ठ नागरिक लवू राणे, सुधीर राणे, वामन राणे आदींसह रुग्ण उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स