ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब शासकीय कर्मचारी घडविणारा गाव बनेल - बाबू घाडीगांवकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब शासकीय कर्मचारी घडविणारा गाव बनेल - बाबू घाडीगांवकर.

प्रकाशन: 06 Nov 2022 03:24 PM
वाचन संख्या 206

चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील पळसंब गावातील पाचवी ते उच्च शिक्षित असणाऱ्या तरुण, तरुणींसाठी “श्री. जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ आयोजित” संकल्प युवा पिढी घडविण्याचा मार्गदर्शन शिबिरास आज दापोली- जालगाव स्थित क्रियाशील पदवीधर शिक्षक तथा सिंधुदुर्गाचे सुपूत्र जेष्ठ साहित्यिक बाबू घाडीगांवकर व निवृत्त क्राईम ब्रांच अधिकारी सुरेंद्र(अन्ना) सकपाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना साहित्यिक बाबू घाडीगांवकर म्हणाले की पळसंब गावातील विद्यार्थ्यांनी नियमीत व प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास पळसंब हे शासकीय कर्मचारी असलेला गाव म्हणून निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या शिबिराला पळसंब गावातील ४० युवकांनी सहभाग दर्शवला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव तथा पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, सहसचिव शेखर पुजारे, सदस्य अमित पुजारे, सुरेश पुजारे, अंगणवाडी सेविका निकिता पुजारे, सुरेश पुजारे, रुपेश पुजारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक-सुत्रसंचालन व समारोप सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावंत यांनी केले. अशी मार्गदर्शन शिबिरे दर महिन्याच्या एका रविवारी होणार आहेत अशी माहिती मंडळाचे सचिव तथा पळसंब सरपंच चंद्रकात गोलतकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स