ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्राचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण…!

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्राचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण…!

प्रकाशन: 06 Nov 2022 03:04 PM
वाचन संख्या 49

बांदा | राकेश परब :
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्राचे लोकार्पण मंत्री चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. कोकण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी येण्यास टाळाटाळ करत असतात त्यामुळे येथील वैद्यकीय सेवेवर त्याचा परिणाम होत असतो, ह्या आरोग्य सेवेचा प्रश्न भरून काढण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावा गावात डॉक्टर घडविण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करा असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. येत्या काही काळातच जिल्ह्यातील अन्य ३६ प्राथमिक आरोग्य केंद्राना टेलिमेडिसिन सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करून कोट्यावधी लोकांना त्याचा फायदा करून दिला त्यामुळेच १ कोटी ६२ लाख रेशनकार्ड धारकांना धान्य मिळण्यास मदत झाली आहे त्याच बरोबर केंद्र शासनाच्या विविध योजनाचे पैसे एका क्लिकवर थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दादू कविटकर यांनी केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील, डॉ. श्रीपाद पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, तेजस्विनी माजगावकर, गोडकर सिस्टर, रुपाली म्हाडगूत, रुपेश देसाई, श्वेता व्हराडकर ,सीमा ठाकुर ,
महेश सारंग, श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, मानसी धुरी, शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, जावेद खतीब, मकरंद तोरसकर बाळू सावंत, विनोद राऊळ, गुरुनाथ पेडणेकर, संदिप बांदेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, बाबा काणेकर, स्वागत नाटेकर, आनंद नेवगी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी आभार सौ. रुपाली शिरसाट यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स