पोलीस भरतीचा मार्ग मोकळा..!
कोरोना काळात फॉर्म भरलेल्यांसाठी देखील सुवर्ण संधी..
मुंबई | ब्युरो न्यूज : राज्यात काही दिवसांपूर्वी शिंदे- फडणवीस सरकारडून पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दयामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यभरात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या पद्भारतीमध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची तयारी केली आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
कोरोना काळात फॉर्म भरलेल्यांसाठी
उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)