ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या किल्ले स्पर्धा निकाल जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या किल्ले स्पर्धा निकाल जाहीर.

प्रकाशन: 02 Nov 2022 05:38 AM
वाचन संख्या 116

स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत करण्यात आली होती भव्य स्पर्धा.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळीचे औचित्य साधून स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ वर्षाखालील व खुल्या गटात असे बांदा शहर मर्यादित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


  
या स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
१)१५ वर्षाखालील गट : प्रथम क्रमांक – कु. साईशा आणि कु. प्रज्वल केसरकर (प्रतापगड), द्वितीय क्रमांक – गौरांग भांगले (लोहगड), तृतीय क्रमांक – शंकर आरोलकर (मल्हारगड).

२)१५ वर्षांवरील तथा खुला गट : प्रथम क्रमांक – श्री गणेश मूर्ती शाळा बांदा-निमजगा (किल्ले जंजिरा), द्वितीय क्रमांक – गवळीटेम्बवाडी (किल्ले पन्हाळा आणि विशाळगड), तृतीय क्रमांक – मेदिनी परब (किल्ले जंजिरा). दोन्ही गटात ४० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.


   
विजेत्या स्पर्धकांना लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, कार्यवाह समीर परब, खजिनदार भूषण सावंत यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स