ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पहाटे मंदिरात चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पहाटे मंदिरात चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला..!

प्रकाशन: 02 Nov 2022 08:26 AM
वाचन संख्या 316

नागरिकांची सतर्कता ; पोलीस ठाण्यात धाव ; संशयीत चोर पोलिसांच्या स्वाधीन.

कणकवली I प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात आज पहाटे ६ वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील जागरुक नागरिकांनी पकडले.
आज बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे .

कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिरची दान पेटी फोडत असताना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, अनिल आणावकर यांच्यासह तेथील काहींनी या चोरट्याला पाहिले व त्याला रंगेहाथ पकडले. त्याची झाडाझडती घेतली. असता त्याच्या खिशात अजून दान पेट्या फोडलेली रक्कम व पान पट्ट्यांमधील गुटखा, पान मसाला अशा देखील वस्तू आढळून आल्या. याबाबत चोरट्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता नागवे रोडवरील राम मंदिर मधली दानपेटी चोरट्याने फोडल्याचे सांगितले. या संशयीत चोट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या चोरट्यासोबत अजून एक साथीदार होता पण नागरिकांची जाग मिळताच त्याने पलायन केले. दरम्यान पोलिसांकडून आता या चोरट्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कणकवलीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती असे सूत्रांकडून समजते आहे .
गेल्या काही काळातील चोऱ्यांची वारंवारिता लक्षात घेता चोरट्यानी कणकवली शहराला लक्ष्य केले असल्याचे दिसून येते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स