पळसंबमध्ये 'संकल्प युवा पिढी घडविण्याचा' मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचा व्यापक युवा मार्गदर्शनपर उपक्रम.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावातील पाचवी ते उच्च शिक्षित असणाऱ्या सर्व तरुण तरुणीं साठी पळसंब शाळा क्रमांक १ येथे रविवारी ६ नोव्हेंबला
सकाळी १० ते १२ या वेळेत श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाने मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
‘संकल्प युवा पिढी घडविण्याचा’ अशी या मार्गदर्शन शिबिराची संकल्पना आहे.
या शिबिराला मार्गदर्शन साठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पळसंब मधील युवा वर्गाने या मार्गदर्शन कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून भविष्यातील उदयोजक तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडविण्यासाठीची संधी स्वतःला द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाला डाॅ. प्रसाद देवधर व डाॅ. हर्षदा देवधर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)