त्या आरोग्य सेविकांनी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट
पुष्पगुच्छ देऊन मानले आभार
उमेश परब / कणकवली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कमी केलेल्या २० आरोग्य सेविकांना राज्य शासनाने परत सेवेत घेण्यास मान्यता दिली आहे. या आरोग्य सेविका पूर्ववत आहे त्याच पदावर आरोग्य सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची त्या आरोग्य सेविकांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर,जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राणे, हर्षद गावडे,राजू राठोड, आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'