ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मुणगे गावचे सुपुत्र सतिश मुणगेकर राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित !
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे गावचे सुपुत्र सतिश मुणगेकर राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित !

प्रकाशन: 09 Sep 2021 09:10 PM
वाचन संख्या 186

प्रतिनिधी/मसुरे : देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा झोंबडी नं.१ शाळेचे पदवीधर शिक्षकश्री.सतिश पांडुरंग मुणगेकर यांना राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शैक्षिक आगाज ही आंतरराष्ट्रीय संस्था सामाजिक शैक्षाणिक पर्यावरण, वृक्ष संगोपन संवर्धन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोशल मीडियाचा शिक्षणासाठी योग्य वापर असे विविध उपक्रम राबविणाऱ्या ऑनलाइन टीचिंग करणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चेत सहभाग घेणाऱ्या तसेच टाकाऊतून टिकाऊ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना स्मार्ट टिचर या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करते. यात महाराष्ट्रातील शिक्षकांना ही राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. एका जिल्हा भरातून एक किंवा दोन शिक्षकांची निवड केली जाते. ऑनलाईनद्वारे या शैक्षिक आगाजचे मुख्य प्रवर्तक श्री. अमीत चौधरी, श्री. हेमन उपाध्याय, माजी डेप्युटी डायरेक्टर अजमेर राजस्थान, श्री. सुभाष राबरा डायरेक्टर ऑफ एनव्हिएस, संस्थापक अध्यक्षा श्रीमती स्मृती चौधरी, उत्तर प्रदेश , तसेच राज्य समन्वक महाराष्ट्र शैक्षिक आगाजचे श्री नाना पाटील भुसावळ आदि मान्यवरांनी सन्मानित केले.
सतिश पांडुरंग मुणगेकर हे मायक्रोसॉफ्ट सर्टीफाय एज्युकेटर असून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य चे राज्य संघटक आहेत. आविष्कार फाऊंडेशन इंडियाचे गुहागर तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात.

Article image


मुणगेकर यांनी स्वतःची व शाळेची ब्लॉग वेबसाईट तयार केलेली आहे. तसेच ३५ आॕफलाईन शैक्षणिक ॲपची निर्मिती करणारे जिल्ह्यातील एकमेव शिक्षक ठरले आहेत. शाळेचे सर्व शालेय अभिलेखे (रेकॉर्ड ) डिजिटल स्कूल सॉप्टवेअर मध्ये असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शाळा त्यांनी बनविली आहे. शैक्षणिक ई – साहित्याची निर्मिती, फ्लिपबुक ई – साहित्याची निर्मिती, वोकलेट ई – साहित्याची निर्मिती, स्मार्ट पीडीएफची निर्मिती, व्हरचूल कलासरूम वापर, 3D, 4D तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर , आभासी प्रयोगशाळेचा अध्यापनात वापर, स्वतःचे स्वराली क्रिएशन यु ट्युब चॕनेल तसेच
विद्यार्थी व शिक्षक यांचे ओळखपत्र Q R CODE मध्ये तयार केलेले आहेत.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोकसंख्या शिक्षण या विभागात सलग विजयाची परंपरा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ऑनलाईन शिक्षक स्पर्धेत पीपीटी सादरीकरणात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे.
गुहागर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तसेच काही गावांमध्ये गुलमोहर, चिंच, बेहडा, इ.५०० रोपांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे.
चिपळुणमध्ये आलेल्या महापुरात पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याची व आर्थिक मदत करण्यात सहभाग घेतला होता.
यापूर्वी त्यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय पर्यावरण पूरक शिक्षक पुरस्कार २०१७, राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ प्राप्त झाला आहे. श्री सतिश मुणगेकर यांना राष्ट्रीय स्वरूपाचे स्मार्ट टिचर अवार्ड मिळाल्याबद्वल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स