ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अखेर मल्हार नदीवरील साकव पूलाचे झाले लोकार्पण

अखेर मल्हार नदीवरील साकव पूलाचे झाले लोकार्पण

प्रकाशन: 09 Sep 2021 07:43 PM
वाचन संख्या 105

शिवसेनेने पाळला गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू करण्याचा शब्द

उमेश परब/कणकवली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने नाटळ येथील मल्हार नदीवरील पूल कोसळला होता. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची संपर्क व्यवस्था कोलमडली होती. या पुलाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी तातडीने उपाययोजना करून गणेश चतुर्थीपूर्वी याठिकाणी पूल उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने या पूलाच्या कामासाठी निधी मंजूर करून दिला. गणेश चतुर्थीआधी युद्धपातळीवर काम करून हा साकव पूल बांधण्यात आल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द सत्यात उतरला आहे. आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी या पुलाचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

नाटळ येथील मल्हार पूल कोसळल्याने आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची वाहतुकीची मोठी गैरसोय झाली होती. ही गैरसोय दूर करून पर्यायी पूलाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत, खास. विनायक राऊत तसेच आम. वैभव नाईक यांनी येथील ग्रामस्थांना दिले होते. त्यादृष्टीने गणेश चतुर्थीआधी हा साकव पूल ग्रामस्थांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली करण्यात आल्या. पालकमंत्री उदय सामंत यांनी या पुलाच्या कामाकरीता तातडीने निधी मंजूर केला होता.
त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मल्हार नदीवरील नवीन पूल वाहतुकीस सुरू झाला. त्याचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक व शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मल्हार नदीवरील या नवीन पर्यायी पुलाचे लोकार्पण झाल्याने गेले काही महिने बंद असलेला रहदारीचा मार्ग ग्रामस्थांसाठी अखेर सुरू झाला आहे.

या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना विधानसभा संघटक सचिन सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, रीमेश चव्हाण, ऍड. हर्षद गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व नाटळ कनेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील उपस्थित होते. अल्पावधीत या पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी समाधान व्यक्त करत जनतेसाठी शिवसेना सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स