ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रावण ग्रामपंचायत येथे "माझा एक दिवस बळीराजासाठी" उपक्रम संपन्न..!

श्रावण ग्रामपंचायत येथे "माझा एक दिवस बळीराजासाठी" उपक्रम संपन्न..!

प्रकाशन: 29 Oct 2022 05:48 PM
वाचन संख्या 65

शेतकरी शिबिरात वन्यप्राण्यांच्या खाद्याची सोय करण्यासाठी निवेदन….!

श्रावण | गणेश चव्हाण :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांचे अंतर्गत माझा एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम ग्रामपंचायत श्रावण येथे तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Article image


शिबीरात, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी एम. आर. इ जी .एस या योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच आत्मा अंतर्गत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची माहिती दिली.
शेतकऱ्यांना गवारेड्या माकड व वन्यजीवांपासून होणाऱ्या त्रासा संदर्भात निवेदन दिले. शेतकरी यांच्या साठी वन्यजिवांपासून मोठा त्रास होत असल्याने, कृषी विभागाने काहीतरी ठोस अशा उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांनी या निवेदनात जंगलामध्ये काही खाद्य नसल्याने माकड किंवा गावारेडे यां सारखे वन्यप्राणी लोक वस्तीत येऊन शेतकऱ्यांच्या शेतांची प्रसंगी घरातील वस्तूंची नासधूस करतात. तोंडाशी आलेल शेत उध्वस्त करतात. त्यामुळे जंगलात खाद्य निर्माण करण्याची सुचना केली. यावेळी रामगड चे कृषी पर्यवेक्षक डी. के सावंत यांनीही उपस्थितांना योग्य असे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच प्रशांत परब, उपसरपंच सौ हर्षदा चव्हाण, सौ. रागिनी पवार, दिपक घाडी, सर्कल सुनील पवार, तलाठी एन. एस. देसाई, कृषी सहाय्यक ए. डी. कुरकुटे, रामगड कृषीसहाय्यक ए. आर. धुरी, प्रकाश बागवे, श्रीधर पुजारे, रामदास पवार, बाबी मोघे, श्याम परब, विलास मोघे, मंगेश यादव, पांडुरंग परब, प्रकाश येरम, बापू परब आदी शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स