ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रावण तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सैनिक सुधाकर मुद्राळे यांची निवड…!

श्रावण तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सैनिक सुधाकर मुद्राळे यांची निवड…!

प्रकाशन: 29 Oct 2022 05:38 PM
वाचन संख्या 71

श्रावण | गणेश चव्हाण :
श्रावण गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून सर्वानुमते माजी सैनिक सुधाकर उर्फ बाळा आत्माराम मुद्राळे यांची निवड करण्यात आली.
सर्व समाजाचे लोक राहत असले तरी श्रावण हा गांव शांत आहे. या गावात सहसा मोठे वाद निर्माण होत नाहीत. या गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी सुधाकर आत्माराम मुद्राळे या स्वातंत्र्य सैनिकांची निवड केल्यामुळे श्रावण परीसरातून मुद्राळे यांचे अभिनंदन होत आहे. सुधाकर मुद्राळे हे सरळ शांत स्वभावाचे व हुशार असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कशा प्रमाणे शांत करायचे याचा पूर्ण अनुभव आहे. सैनिक म्हणुन सेवा करतांना देशांमध्ये अनेक राज्ये फिरून अनेक भाषा अवगत केल्या आहेत त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशी कसं वागायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे याचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यांची ही कारकीर्द पूर्णपणे यशस्वी होईल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. मुद्राळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्रावण ग्रामसभेमध्ये त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स